Breaking News

रस्ते अपघातात 25 जणांचा मृत्यू

Advertisements

कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 7.15 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वर चित्रावती वाहतूक पोलीस ठाण्यासमोर हा अपघात घडला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर महाराष्ट्र राज्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय.

Advertisements

राष्ट्रीय महामार्ग 44 वर समोरून येणाऱ्या टाटा सुमोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक आणि सुमो यांच्यात झालेल्या धडकेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे देखील काही प्रवाशांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे सुमो चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नाही आणि धडक बसली.

Advertisements

गुरुवारी पहाटे बंगळुरूपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिक्कबल्लापूरच्या हद्दीत थांबलेल्या एका ट्रकला मल्टी युटिलिटी व्हेईकलने धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती हे आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंटला भागातील आहे. प्राथमिक तपासात एमयूव्ही आंध्र प्रदेशातून बंगळुरूकडे जात होती आणि दाट धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला त्याने धडक दिली

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *