Breaking News

नागपुरातील वैशाली नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट : तीन घरांना आग

Advertisements

उत्तर नागपुरातील महर्षी दयानंदनगर, वैशालीनगर परिसरात आज रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका मागोमाग तीन घरांना आग लागली.

Advertisements

यात टीव्ही, फ्रिज अशा घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. एका सिलेंडरच्या गॅस गळतीने ही घटना घडल्याची माहिती धकाते कुटुंबियांनी दिली.

Advertisements

वैशाली नगर परिसरात अचानक गॅसची गळती व आग लागल्याचे कळताच तीन अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आसपासच्या परिसरातील नागरिकही मदतीला धावून आले. एका सिलिंडरच्या गळतीमुळे ही घटना घडल्याची माहिती मनपा अग्निशमन सूत्रांनी दिली. डागा प्रसाद धकाते, ललित प्रसाद धकाते, शितल प्रसाद धकाते अशी घरमालकांची नावे असून या तिघांकडे सुमारे नऊ व्यावसायिक व्यापाराचे सिलिंडर होते. डागा प्रसाद यांच्याकडे पाच, ललित प्रसाद यांच्याकडे दोन तर शीतल प्रसाद यांच्याकडे दोन सिलेंडर होते. यापैकीच एकाची गॅस गळती व नंतर स्फोट झाला यात वरचे संपूर्ण नोझल उडाल्याने भीषण आग लागली. घराचे छप्पर उडाले तसेच घरगुती साहित्य आगी जळून खाक झाले. एकाच कुटुंबात इतके गॅस सिलिंडर कसे काय? याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *