पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून राजकीय तापलं. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावरून बदली झाल्यानंतर हितसंबंध जपणे हाच या बदलीमागील हेतू आहे, असं म्हणत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आरोप केला होता.
पीएमपीचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांची अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी आणि भाजप नेते उज्ज्वल केसकर यांनी टीका केली. ‘पीएमपीएमएल कडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला होता.
राज्यातील शिंदे सरकारने आज चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहे.
या आदेशात आयएएस अधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह , राधाविनोद अरिबाम शर्मा, एस. राममूर्ती आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.
राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) IAS सचिन्द्र प्रताप सिंह (2007) यांची यशदा, पुणे येथे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२) IAS राधाबिनोद अरिबम शर्मा (2012) मुख्य प्रशासक, सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची Jt.MC, MMRDA मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
३) IAS एस. राममूर्ती (2013) Jt.MC, MMRDA, मुंबई यांची सचिव, फी नियामक प्राधिकरण, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
४) IAS अमन मित्तल (2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, MPCL, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्वभारत News Website