Breaking News

थंडी : गोंदिया, पुणे, संभाजीनगरमध्ये पारा आला 14.4 अंशांवर

Advertisements

गोंदिया, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहराच्या किमान तापमानात साडेतीन ते चार अंशांनी घट होऊन पारा 14.4 अंशांवर खाली आला. शुक्रवारी राज्यातील सर्वांत कमी तापमान या तीन शहरांत होते. राज्यातील हवामान शुष्क आणि कोरडे झाल्याने थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचे किमान तापमान 18 वरून 11 अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुणे शहराचे किमान तापमान 17.5 वरून 14.4 अंशांवर, तर गोंदियाचे तापमानही 18 वरून 14.4 अंशांवर खाली आले होते. राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात शुक्रवारी 3 ते 6 अंशांनी घट झाली.

Advertisements

शुक्रवारचे राज्याचे किमान तापमान

Advertisements

पुणे 14.4, छत्रपती संभाजीनगर 14.4, गोंदिया 14.4 नाशिक 15, महाबळेश्वर 15.6, नाशिक व परभणी 16.5, सातारा 16.5, सांगली 18.1, सोलापूर 16.5, नांदेड 18.2, अकोला 17, अमरावती 16, चंद्रपूर 16.4.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *