Breaking News

तेली समाजाची स्वतंत्र जणगणना करा

Advertisements

न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीच्या सुचनेप्रमाणे पुढील चार दिवसात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले. याच धर्तीवर तेली समाजाची गणना करावी, अशी मागणी विश्व तेली समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारेमोरे, राम घोड़े,अनिल भेंडे, भीष्मा भूरे, महेश चाभारे, चरड़े, नीमकर वडिभस्मे गुरूजी, तलमले वैतागे,सावरकर, राजगिरे,राजू फटिंग,देवेंद पवार रमेश गिरीपंजे,वैभव बारई,अशोक हिंगे, मनोज शाहू यांनी केली आहे.

Advertisements

जिल्ह्यात मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. कालमर्यादेत काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले.अधिका-यांनी खसरा पत्रक, कुळ नोंदवही, शैक्षणिक अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्यूपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या वेळी घेतलेल्या नोंदी आदींची तपासणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या.

Advertisements

मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये वंशावळी, निजामकालीन पुरावे, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे तपासण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या निर्देशावरून हे काम सुरू आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *