मराठा समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. यातच तेली समाजही आक्रमक होत आहे.न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीच्या सुचनेप्रमाणे पुढील चार दिवसात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले. याच धर्तीवर तेली समाजाची गणना करावी, अशी मागणी विश्व तेली समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारेमोरे, राम घोड़े,अनिल भेंडे, भीष्मा भूरे, महेश चाभारे, चरड़े, नीमकर वडिभस्मे गुरूजी, तलमले वैतागे,सावरकर, राजगिरे,राजू फटिंग,देवेंद पवार रमेश गिरीपंजे,वैभव बारई,अशोक हिंगे, मनोज शाहू यांनी केली आहे. आरक्षण न दिल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. कालमर्यादेत काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले.अधिका-यांनी खसरा पत्रक, कुळ नोंदवही, शैक्षणिक अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्यूपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या वेळी घेतलेल्या नोंदी आदींची तपासणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या.
मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये वंशावळी, निजामकालीन पुरावे, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे तपासण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या निर्देशावरून हे काम सुरू आहे.
विश्वभारत News Website