Breaking News

नागपूर : कुहीतील प्रसिद्ध अंभोऱ्याचा होणार विकास

Advertisements

विदर्भातील दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी राज्य शासनाने अलीकडेच मोठे निर्णय घेतले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अंभोरा पर्यटन स्थळाच्या विकासाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली.

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जल पर्यटन केंद्र तयार करण्यात येत आहे. त्यासाठी १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार गोसीखुर्द जलाशय परिसरात सदर प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून (पीपीपी) होणार आहे.

Advertisements

अंभोरा विकास आराखड्याला मान्यता

कुही तालुक्यातील अंभोरा पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी २४८ कोटींच्या आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ७४ कोटी ४० लाखांचा निधी वितरीत केला जाणार आहे. अंभोरा येथे आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. आता अंभोरा पर्यटन विकास दोन टप्प्यांत होणार आहे. बांधकामादरम्यान सिमेंट कॉंक्रिटचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *