Breaking News

नागपुरात फटाके किती वाजता फोडता येतील? अन्यथा…!

Advertisements

नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे.

Advertisements

नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडून स्वच्छ, शुभ दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Advertisements

वायु प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

नागपूर शहरातील वायू प्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी याबाबत निरंतर कार्यवाही गरजेची असून त्यादृष्टीने महानगरपालिकेने पाऊल टाकले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली असून या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलीस विभागाला देखील उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. याशिवाय शहरामधील बांधकांम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *