परमिट रूम रेस्ट्रॉरेंटमधील मद्यावर राज्य शासनाने मुल्यवर्धित करात (व्हॅट) ५ टक्यांवरून १० टक्के वाढ केल्याने गुरूवारी नागपूरसह विदर्भातील परमिटरूम बंद होते.
कर वाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी नागपूर जिल्हा रेस्ट्रॉरेंट परमिट रुम असोसिएशनच्या नेतृत्वात गुरूवारी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. त्यानंतर तेथून एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात बार मालक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाच्या निर्णयाविरोधात शहरातील बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट एक दिवस बंद ठेवण्यात आले.
नागपूर जिल्हा रेस्ट्रॉरेंट परमिट रुम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल म्हणाले, शासनाने व्यवसायिकांशी चर्चा न करता १ नोव्हेंबरपासून परमिटरूममधील मद्याावरील मुल्यवर्धीत करात५ टक्केवरून १० टक्के वाढ केली. परमिटरूमच्या परवान्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. परवाना शुल्क ९ लाख रुपये आकारले जाते. तो दरवर्षी भरावा लागतो. यामुळे या व्यवसायिकांचे कंबरडेच मोडले आहे. करवाढीने शासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घट होईल.हा कर कमी करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी आंदोलन करण्यात आले आहे.
विश्वभारत News Website