Breaking News

५ वाघांचे एकत्र दर्शन : कोणत्या जंगलात? वाचा

Advertisements

पर्यटकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. कारण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यात प्रदीर्घ कालावधीनंतर ५ वाघांचे एकत्र दर्शन झाल्याने पर्यटक व इको गाईडमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

Advertisements

शुक्रवारी सकाळी टी ४ वाघीण आणि तिचे ४ प्रौढ शावक दिसल्यानंतर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा आहे. आठवडाभराच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पर्यटन सुरू झाले आणि सकाळी पिटेझरी ते नागझिरा संकुलाकडे जाणाऱ्या बुधा बुधीजवळ टी ४ वाघीण आणि तिची ४ पिल्ले आढळून आली. मुंडीपार आणि गोरेगाव येथील पर्यटकांनी याचा व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर लगेच प्रसारित झाला.

Advertisements

बुकिंगवर परिणाम

वाघांच्या दर्शनाचा परिणाम सफारी बुकिंगवर दिसून आला आणि महा इको टुरिझमची ऑनलाइन बुकिंग एका दिवसात फुल्ल झाली. चोरखमारा आणि पिटेझरी प्रवेशद्वारातून नागझिरामध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. इको टुरिझमचे मार्गदर्शक सुभाष उईके यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांनी वाघाचे दर्शन झाल्याने नागझिराप्रेमी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी आतूर झाले असून जिप्सी चालक व मार्गदर्शकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *