Breaking News

क्रिकेटपटू रोहित शर्मा होणार निवृत्त?

Advertisements

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणखी टी-२० क्रिकेट खेळणार नाही आणि दोन दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच त्याने याबाबत नियामक मंडळातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.

Advertisements

रोहित शमनि नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनल एक्झिटनंतर एकही टी- २० सामना खेळलेला नाही. त्यानंतर हार्दिक पंड्यानेच टी-२० मध्ये बहुतांशी सामन्यांत नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. ३६ वर्षीय रोहित शनि आतापर्यंत १४८ टी-२० सामने खेळले असून, यात १४० चा स्ट्राईकरेट व ४ शतकांसह ३,८५३ धावा फटकावल्या आहेत. सध्याच्या स्थितीत तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत राहणे, तसेच दोन महिने ‘आयपीएल’ व डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ७ कसोटी खेळणे अशक्यप्राय आहे आणि रोहितचा यातही कसोटी क्रिकेटवर फोकस असणे साहजिक आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *