नागपूर शहरात सेक्स रॅकेट वाढला : दिल्ली-मुंबईच्या तरुणी तारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामी

देहव्यापाराचे लोन पसरले असून मुंबई-पुणे आणि दिल्लीच्या काही मॉडेल्स तरुणी नागपूर शहरात करारावर मुक्कामी आल्या आहेत. दलालांनी काही तारांकित हॉटेल्समध्ये तरुणींची व्यवस्था केली असून राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी अश्लील नृत्याच्या मैफील रंगत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरात आंबटशौकिनांची वाढती संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई, काश्मिर, दिल्ली येथील तरुणी देहव्यापारासाठी करारतत्वावर नागपुरात येतात. त्यांच्या संपर्कात नागपुरातील अनेक दलाल असतात. अन्य राज्यातून विमानाने नागपुरात येणाऱ्या तरुणींना तारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येते. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात बाहेर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. त्याचा अंदाज बघता नागपुरातील दलाल सक्रीय झाले आहेत. नागपुरातील सेक्स रॅकेटची वाढती संख्या बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर काही पोलिसांच्या नियमित भेटी असल्याची माहिती मिळाली आहे.

उपराजधानीत ऑनलाईन स्वरुपात देहव्यापार सुरु असून नागपुरातील अनेक दलालांनी सेक्स रॅकेट चालविण्यासाठी थेट इंटरनेटवर संकेतस्थळ तयार करुन जाहिराती करणे सुरु केले आहे. इंटरनेटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हीस’च्या नावाखाली नागपुरातील अनेक तरुणींचे छायाचित्र आणि थेट भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. दलालांनी स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिले असून त्यावर संपर्क केल्यास लगेच प्रतिसाद देण्यात येतो. संपर्क करणाऱ्या आंबटशौकीनांची संपूर्ण माहिती घेण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उपराजधानीत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील तरुणी देहव्यापारासाठी नागपुरातील दलालांकडे येत असल्याची माहिती आहे.

बेलतरोडी आणि अंबाझरीत अनेक दलालांनी सेक्स रॅकेटचे अड्डे तयार केले आहेत. तसेच सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सदर, रामदासपेठ, मनिषनगर, पंचशिल चौक, फुटाळा, अंबाझरी तलाव अशा गजबजलेल्या ठिकाणांवरून दलाल मुलींना आंबटशौकीन ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येतात. तसेच फार्महाऊसवर अश्लील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. विशेषकरून शनिवारी, रविवारी फार्महाऊसवर मोठी गर्दी असते.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *