Breaking News

आजपासून सरकारी कर्मचारी संपावर : सरकार म्हणते…”झुकेगा नही…”

Advertisements

जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने गुरूवारपासून संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. मात्र सरकारने जुन्या पेन्शनबाबत निर्णय न घेतल्याने संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती.

Advertisements

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बुधवारी सांयकाळी पाच वाजता मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते. सुबोधकुमार समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर अभ्यास व्हायचा आहे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकार जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्यावतीने संघटनांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले. संपाचा निर्णय स्थगित करण्याची विनंती केली. मात्र सुकाणू समितीया बैठकीतच संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर संघटनाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात गुरूवारपासून संपावरजाण्याचा निर्णय घेण्यात आला असे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अशोक दगडे यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *