Breaking News

यंदा १३२ दिवस नागपूर हायकोर्टाची दारे असतील बंद : कारणे काय?

Advertisements

मुंबई उच्च न्यायालयाची दारे २०२४ सालातील ३६५ दिवसांपैकी १३२ दिवस बंद राहतील. टक्केवारीनुसार बघितले तर वर्षातील ३६ टक्के दिवस उच्च न्यायालयात कामकाज होणार नाही. ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.

Advertisements

मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठात ही दिनदर्शिका लागू राहणार आहे. यानुसार, उच्च न्यायालयाला ग्रीष्मकालीन ३० दिवस सुट्टी तर दिवाळीनिमित्त १६ दिवस न्यायालय बंद राहणार आहे. नाताळनिमित्त देखील उच्च न्यायालयात १० दिवसाचा अवकाश राहील. उच्च न्यायालयात १३ मे ते ९ जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील. दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्टोबर पासून ८ नोव्हेंबर पर्यंत राहतील. महिन्यानुसार बघितले तर उच्च न्यायालय सर्वाधिक २३ दिवस मे महिन्यात बंद राहील. जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी १४ दिवस न्यायालयीन कामकाज होणार नाही. सणानिमित्त १८ दिवस न्यायालयाची दारे बंद राहतील. याशिवाय ५२ रविवार तसेच प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार असे २६ शनिवार देखील न्यायालय बंद राहील. खंडपीठानुसारही काही विशेष दिवशी न्यायालयाला सुट्टी देण्यात आली आहे.

Advertisements

 

 

नागपूर खंडपीठात १० मे रोजी अक्षय तृतीया आणि ११ सप्टेंबर रोजी ‘महालक्ष्मी पूजा’निमित्त सुट्टी राहील. पणजी खंडपीठात ६ सप्टेंबरला हरतालिका, ३ डिसेंबरला ‘फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हिअर’ तसेच १९ डिसेंबरला ‘गोवा मुक्ती दिना’निमित्त सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *