Breaking News

ईशा देओलने का घेतला घटस्फोट : हेमा मालिनीसोबत का बिनसलं?

Advertisements

ईशा देओलने अभिनयाच्या जोरावर ईशाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सध्या ईशा अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाव्यतरिक्त ईशा आपल्या व्यक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

Advertisements

काही दिवसांपूर्वीच ईशा तिचा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली असल्याची बातमी समोर आली होती. फ्री प्रेस जर्नल’ने याबाबत एक बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीनुसार एका सोशल मीडिया युजरने आपल्या पोस्टमध्ये ईशा व भरत एकमेकांपासून वेगळे झाले असल्याचे सांगण्यात आले होते. एवढचं नाही तर भरत आपली पत्नी ईशाची फसवणूक करत असल्याचा दावा करण्यात आला होता. या घटस्फोटाच्या चर्चादरम्यान ईशा देओलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अनेक तर्क-विर्तकांना उधाण आले आहे.

Advertisements

ईशा देओलने तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट ‘कोई मेरे दिल से पूछे’ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या चित्रपटातील ‘लपाक-झपाक’ या गाण्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ईशाने या व्हिडीओबरोबर लिहिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ईशाने लिहिले- ‘कधीकधी तुम्ही गोष्टी सोडून द्यायला हव्यात आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचायला हवं. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या आणि मी १८ वर्षांची असतानाच्या आठवणी. गेल्या गुरूवारी ११ जानेवारीला माझ्या पहिल्या चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट माझ्या नेहमीच लक्षात राहतो कारण हा माझा पहिला चित्रपट आहे.”

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्नगाठ बांधली. ईशा व भरत यांना राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत. अनेकदा ईशा आपला पती व मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र दिसले नाहीत त्यामुळे ईशा व भरत यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर भरत ईशा देओलची आई हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही गैरहजर होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *