Breaking News

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज!

Advertisements

प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल-निनोची स्थिती फेब्रुवारी महिन्यांतही सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. मात्र, फेब्रुवारीनंतर एल-निनोची स्थिती हळूहळू कमजोर पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

Advertisements

 

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती कायम आहे. तेथील समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीनंतर एल-निनो स्थिती हळूहळू कमजोर पडण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच हिंदी महासागरातील द्वि-धुव्रिताही सध्या सक्रिय आहे. पुढील एक दोन महिन्यांत ही स्थिती तटस्थ अवस्थेत पोहचण्याची शक्यता आहे.

Advertisements

 

फेब्रुवारीत देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात देशभरात सरासरी २२.७ मिमी पाऊस पडतो, सरासरीच्या तुलनेत ११९ टक्के पावसाचा अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

मागील वर्षभर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहिले होते. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसने जास्तच राहिले आहे. फेब्रुवारी महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान देशभरात जास्त राहण्याचा अंदाज आहे. मात्र, राज्यात मुंबई, किनारपट्टी वगळता कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता कमीच आहे.

गेल्या महिन्यात ७.२ मिमी पाऊस

जानेवारी महिन्यांत देशभरात सरासरी ७.२ मिमी पाऊस पडला आहे. १९०१ ते २०२४ या काळातील नवव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे. जानेवारी महिन्यांत देशात सरासरी १७.१ मिमी पाऊस पडतो. विभागनिहाय विचार करता उत्तर भारतात सरासरी ३३.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात फक्त ३.१ मिमी पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरी १७.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५.६ मिमी पाऊस झाला. मध्य भारतात सरासरी ७.४ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५.३ मिमी पाऊस झाला. दक्षिण भारतात सरासरी ७.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १८.२ मिमी म्हणजे सरासरीच्या १३३ टक्के पाऊस पडला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *