Breaking News

महेश गायकवाडवर सहा गोळ्या झाडल्या : डॉक्टर काय म्हणाले? भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक

Advertisements

ठाण्यातील कल्याण डोंबिवली शहरात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोर झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले. त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाचे अपडेट डॉक्टरांनी दिले आहे. त्याची माहिती कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक, शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *