Breaking News

मिलिंद देवरानी काँग्रेस का सोडली?राहुल गांधी यांचं मोठं विधान

Advertisements

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा देशव्यापी दौरा सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांची न्याय यात्रा सुरू झाली आहे. त्यांच्या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. अनेक लोक राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या व्यथा, वेदना सांगताना दिसत आहेत. तर काही लोक केंद्र सरकारवर संतापही व्यक्त करताना दिसत आहेत.

Advertisements

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. यावेळी त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. हिंमत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे. तसं मला वाटतं. कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा का छिंदवाड़ा आगमन आज

BJP के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा का छिंदवाड़ा आगमन आज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

डबल इंजिन की सरकार ने महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार सब कुछ डबल किया है ? नकुलनाथ का आरोप

डबल इंजिन की सरकार ने महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार सब कुछ डबल किया है ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *