नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळी गडकरी, फडणवीस करणार मुक्काम

येत्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रमुख नेत्याला एक दिवस गावात मुक्काम करायचा आहे. नागपूरमध्ये गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते राहतात. ते सुद्धा या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांचा मुक्काम जिल्ह्यातील दोन प्रसिद्ध तीर्थस्थळी राहणार आहे.

४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात भाजपचे ‘गाव चलो’ अभियान राबविण्यात येत आहे. कार्यकर्ता हा जनतेच्या सतत संपर्कात असला पाहीजे, या दृष्टीने विवीध अभियान भाजपकडून राबवण्यात येतात. त्याच प्रमाणे प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांतील योजना पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात सहभागी होणारे गडकरी, फडणवीस हे नेते कोणत्या गावात जाणार याबाबत उत्सुकता होती. गडकरी यांनी या अभियानासाठी त्यांचे स्वतःचे गाव व जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ धापेवाडाची निवड केली. विदर्भाचे पंढरपूर म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात गडकरी गाव चलो अभियानादरम्यान मुक्काम करणार आहेत. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ पारडसिंगा (ता. काटोल ) येथे, मुक्काम करणार आहेत. पारडसिंगा येथे सती अनसूयामातेची समाधी आहे.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *