Breaking News

लिपिक, कोतवाल अडकले : वाळू वाहन चालवण्यासाठी ५० हजारांची लाच

Advertisements

वाळूचे वाहन चालवण्यासह व कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्यातील अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहायक व एका कोतवालाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी पकडले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisements

प्रवीण लक्ष्मण पवार व खांडागळे, अशी लाच घेणाऱ्यांची नावे असल्याची माहिती सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी दिली. प्रवीण पवार हा अंबड तहसील कार्यालयात महसूल सहायक आहे. तर खांडागळे हा कोतवाल म्हणून काम पाहतो. प्रवीण पवार याने तक्रारदाराची वाळू वाहतूक करताना यापूर्वी पकडलेली गाडी सोडल्याचा मोबदला व यापुढे वाळू वाहतूक सुरूच ठेवून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. २८ व २९ डिसेंबर रोजी ५० हजारांची मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून खांडागळे हा ५० हजारांची लाच प्रवीण पवार याला देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहित करत होता.

Advertisements

यासंदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवल्यानंतर त्याची पडताळणी झाली. लाच देण्याविषयी तक्रारदार व लाच घेणाऱ्यांमध्ये संवाद झाल्याची खातरजमा झाल्यानंतर पथकाने सापळा रचला. रविवारी वरील दोन्ही लाच घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *