Breaking News

कधी बरसणार पाऊस?राज्यात पुन्हा पावसाचे सावट

Advertisements

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Advertisements

 

Advertisements

उत्तर भारतात यावर्षी कडाक्याची थंडी होती. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला. आता उत्तरेकडील थंडी कमी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागातून थंडीने सुद्धा काढता पाय घेतला आहे. थंड वाऱ्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास हलका गारवा जाणवत आहे. तरीही किमान तापमानसह कमाल तापमानातसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे आता दिवस उन्हाचे हलके चटके जाणवू लागले आहेत.

आजपासून महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ ते तेलंगणा, कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण आहे. तर आजपासून अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम,त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *