Breaking News

उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी? ठाकरेंच्या सर्वात जवळच्या नेत्याची धक्कादायक मागणी

Advertisements

उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी, माजी मंत्री विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी करण्याची मागणी केली.

Advertisements

इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षास, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे. आतापर्यंत दिलेले सर्व खोके कुठे गेले? ते सर्व बाहेर आलं पाहिजे. भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Advertisements

कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू आहे. त्यासाठी रामदास कदम कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असावी अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मला अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पण महाराष्ट्रात बाप-बेटे असे दोघेजण… उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू यांचं दोघांचं जर बोलणं आपण ऐकलं, त्यांचे टोमणे जर आपण ऐकले तर विझताना जसा दिवा फडफडतो, तसं ते फडफडताना दिसत आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

फक्त अडीच तासच मंत्रालयात बसले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधून लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण केलं. चंद्रावर यान पाठवून विज्ञानक्षेत्रात मोठी झेप घेतली. अबूधाबीत मंदिरही बांधलं. तरीही उद्धव ठाकरे हे मोदींनाच बोलत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. नालायक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अडीच वर्षात ते फक्त अडीच तासच मंत्रालयात बसले, अशी घणाघाती टीकाही रामदास कदम यांनी केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

‘मोदी-शहा तुम्ही काहीही करा, मी मुख्यमंत्री पद सोडणार नाही!’ : ममता बॅनर्जी अडल्या

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०७ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भाजपाची सत्ता पश्चिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *