Breaking News

अजित पवारांना मोठा धक्का : 137 जणांचा राजीनामा

Advertisements

लोकसभा निवडणूक समोर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारं एक प्रकरण समोर आलं आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे.

Advertisements

 

लोणवळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गटात) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा का छिंदवाड़ा आगमन आज

BJP के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा का छिंदवाड़ा आगमन आज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

डबल इंजिन की सरकार ने महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार सब कुछ डबल किया है ? नकुलनाथ का आरोप

डबल इंजिन की सरकार ने महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार सब कुछ डबल किया है ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *