Breaking News

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Advertisements

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेली पारवे-फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात होती. अशातच आता राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे आता लढत जोरदार होणार आहे.माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून मैदानात असतील. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?◾️   ◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, …

ममता बॅनर्जीला कुणीतरी धक्का दिलाय : डॉक्टरांचा खळबळजनक दावा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता कालीघाट येथे राहतात. “ममता बॅनर्जी घरात पडल्या तो अपघात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *