Breaking News

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक : नागपूर किती?

दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याखालोखाल वाशीम ४१.४ तर विदर्भाच्या तुलनेत ‘सुसह्य तापमान’ असणाऱ्या बुलढाणा शहरानेही ४० चा आकडा पार केला. यामुळे आजचा मंगळवार अकोला, वाशीम आणि बुलढाणावासीयांच्या जीवाची काहिली करणारा ठरला.

 

मंगळवार, २६ मार्चला बुलढाणा शहरात ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा आजवरच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले. या तुलनेत किमान तापमान २२.६ अंश इतके होते. मागील सहा दिवसांपासून बुलढाण्याचे तापमान ३७.४ ते ३७.८ दरम्यान रेंगाळत होते. मात्र, आज तापमानाने चाळीशी पार केली. यामुळे बुलढाणावासीयांसाठी आजचा दिवस असह्य ठरला. रोजे ठेवणाऱ्या हजारो मुस्लीम बांधवांची कठोर परीक्षा घेणारा हा दिवस ठरला.

 

मार्चमध्ये बुलढाण्याचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास राहते. मात्र यंदा त्याने मार्चमध्येच चाळीसचा आकडा पार केला. कमालच्या तुलनेत किमान तापमान २० ते २३ अंशादरम्यान राहत आहे. यामुळे आजार व रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात : न्यायालयाकडून लवकरच निर्णय

भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *