Breaking News

उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका

Advertisements

अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळे कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता नागपूरसह उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

Advertisements

सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळं ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisements

 

उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार

 

हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरु असणारा एप्रिल आणि ऐन उन्हाळ्यातला मे महिना अधिक उष्ण राहणार असून, यादरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळं दैनंदिन कामं आणि सध्या सुरु असणारी निवडणुकांची रणधुमाळी पाहता या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागानं केल्या आहेत.

 

मराठवाड्यातील तापमान वाढणार

 

नुकतंच भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरात मार्च महिना अल निनोमुळं सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचा इशारा यावेळी हवामान विभागानं देत येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली.

उष्णतेचा पावसावर काय परिणाम?

सध्या पॅसिफिक महासागरात सक्रीय असणारा अल निनो एप्रिल-मे महिन्यात तुलनेनं कमी तीव्रतेकडे झुकणार असून, पुढं ला-निनाची स्थिती तयार होऊ शकते. असं झाल्यास पूर्वमोसमी पावसासाठी आणि मान्सूनसाठीसुद्धा पोषक वातावरणनिर्मिती तयार होऊ शकते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सरकारी वकीलानेच केला सरकारचा विरोध : नागपूर हायकोर्टात घडला प्रसंग

न्यायालयात सरकारच्या धोरणाची सरकारी वकीलाला पाठराखण करावी लागते. शासकीय अधिकाऱ्यांचा बचाव करावा लागतो तसेच निर्णय …

४० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने!

मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *