Breaking News

बावनकुळेनी माझं राजकीय आयुष्य उध्वस्त केलं : कोणी केला आरोप?

उमेदवारी देऊ नये म्हणून बावनकुळे यांचाच दबाव होता, त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यानी घेतली होती, त्यामुळे रामटेकच्या शिवसेनेच्या पराभावासाठी तेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप रामटेकचे शिंदेगटाचे मावळते खासदार कृपाल तुमाने यांनी दिल्लीत वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. बावनकुळेविरोधात भाजप नेते अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर तुमाने यांनी थेट दिल्लीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले.दिल्लीत वृत्तवाहिनीशी बोलताना तुमाने म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वेक्षणाचा आधार घेऊन मला उमेदवारी देऊ नका, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यासाठी अमित शहायांच्याकडून दबाव आणला होता. रामटेकमध्ये कामठी हा माझा मतदारसंघ आहे, तेथून शिवसेनेचा उमेदवार विजयी करायचा असेल तर उमेदवार बदलवा, असे त्यांचे म्हणने होते. उमेदवार बदलला पण जो उमेदवार दिला त्याला सुद्धा ते निवडून आणू शकले नाही, त्यामुळे रामटेकच्या पराभवाची जबाबदारी त्यांनीच आहे.तेच खरे व्हिलन आहेत, असा आरोप तुमाने यांनी वृत्तावाहिनीशी बोलताना केला.

 

तुमाने म्हणाले, मी दोनदा रामटेकचे प्रतिनिधित्व केले. दोन्ही वेळेला लाखाहून अधिक मतांनी निवडून आलो असतो. भाजपने कुठला सर्व्हे केला याची कल्पना नाही.त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर मला आनंद झाला असता. मात्र काँग्रेसच्या व्यक्तीला आणून तिकीट दिले, ते मुख्यमंत्र्यांवर दररोज दबाव आणायचे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दबाव आणून त्यांनी माझे तिकीट कापले, असा आरोप तुमताने यांनी केला.

 

गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार

मी अमित शहा यांना भेटून त्यांना तिकीट का कापली याची विचारणा करणार व बावनकुळे यांची तक्रार करणार असल्याचे तुमाने यांनी सांगितले. ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी शकणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असे बावनकुळे म्हणाले होते. आता त्यांच्यात विधानसभेत महायुतीचा उमेदवार मोठ्या पिछाडीवर होता. आता बावनकुळे स्वतःपासून कारवाई करणार का असा सवाल त्यांनी केला.

About विश्व भारत

Check Also

MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा : उद्धव ठाकरे की डिमांड

मुंबई में MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा, उद्धव ठाकरे की डिमांड? …

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *