Breaking News

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे : आजपासून कामावर येणार

महसूल मंत्री आणि राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्यात मंगळवारी दोन टप्प्यात पार पडलेली चर्चा आणि वाटाघाटी यशस्वी ठरल्या आहे. यामुळे मागील आठवड्यापासून सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आज संघटनेकडून करण्यात आली. आज बुधवार, २४ जुलै पासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी कामावर रुजू होणार आहे. महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मागील १५ जुलै पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले होते.

 

उशिरा का होईना सरकारने महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलविले.मंगळवारी २३ जुलैला मुंबई येथील मंत्रालयातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात ही बैठक पार पडली. दोन टप्प्यात ही बैठक पार पडली. महसूल संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र नियोजित वेळी महसूल मंत्र्यांना अति महत्त्वाची बैठक असल्यामुळे प्रारंभीची बैठक अप्पर मुख्य सचिव यांनी घेतली. त्यावेळी मागण्याशी संबधित मंत्रालयीन विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी आकृतीबंधच्या मुख्य मागणिबाबत मोठा निर्णय झाला. अपर मुख्य सचिव यांनी, ‘दांगट समितीचा अहवाल आहे तसा स्वीकारण्यात येत असल्याचे’ सांगितले. लवकरात लवकर त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, संबंधित कार्यासनाने कार्यवाही चालू केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अव्वल कारकून या पदाचे पदनाम सहाय्यक महसुल अधिकारी करण्याबाबत शासनाने सामान्य प्रशासन विभागाकडे निर्णयासाठी ‘नस्ती’ सादर केली आहे. तसेच इतर मागण्यांबाबत देखील संबंधित विभाग प्रमुख यांना सूचना दिलेल्या असून त्याबाबतचे सर्व ‘फाईल’ कार्यवाहीत असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे अपर मुख्य सचिव यांनी सांगितले

 

अव्वल कारकून संवर्गाच्या वेतन त्रुटी संदर्भातील ‘नस्ती’ वित्त विभागाकडे सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय होणार असून विभागीय दुय्यम सेवा व महसूल अर्थ परीक्षा बाबत दोन्ही परीक्षा मिळून एकच परीक्षा घेण्याबाबत नस्ती तयार करणयात आली आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल असं सांगितले. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्याचे आवाहन सचिव यांनी केले.

 

महसूल मंत्री विखें सोबत चर्चा

 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोबत देखील संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली. मंत्री देखील सर्व मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे पगार कापला जाणार नाही,याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. या बैठकीनंतर

 

बहुतेक मागण्या मार्गी लागल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचे पदाधिकारी यांनी जाहीर केले.सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी आपल्या कामावर हजर होऊन सात दिवसातील प्रलंबित राहिलेले कामकाज पूर्ण करण्याकडे प्राधान्य द्यावे, असे आवाहन देखील संघटनेकडून करण्यात आले.

 

यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आठ दिवसांपासून महसूल विभागाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले होते. ‘लाडक्या बहिणीं’ची कामे रखडली. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर , उत्पन्न दाखला, महसूल चे ना हरकत प्रमाणपत्र,संजय गांधी निराधार योजना, आदी नागरिक आणि योजनाचे लाभार्थी यांची कामे रखडली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि तहसिल कार्यलयातील कामे प्रभावित झाली होती.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी …

४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक : बोगस अपंग प्रमाणपत्राची शोध मोहिम

निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *