राज्य प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवत विधानसभा निवडणुक अधिक चुरशीची केली आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रहार आणि बच्चू कडू यांना विदर्भात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपने जोरदार धक्का दिल्याचे बोलेले जात आहे.
4 नोव्हेंबरला मोठा स्फोट पाहायला मिळणार
चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. जरांगे पाटील यांच्या संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला.