Oplus_131072

चंद्रशेखर बावनकुळे यांना हरविण्यासाठी भाजपमधील कोण?बरेच नेते प्रचारातून गायब…!

कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश भोयर रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवित असल्याने या मतदारसंघाच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भाजप आणि बावनकुळे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.मात्र, बावनकुळे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात. त्यांना हरविण्यासाठी भाजपमधील काही वरिष्ठ नेते सक्रिय झाल्याची चर्चा आहे. बावनकुळे यांच्यासाठी सोपी असणारी निवडणूक कठीण होत असल्याचे दिसते.कामठी-मौदातील काही भाजप नेते अजूनही बावनकुळे यांच्या समर्थनात उतरली नसल्याचे पाहायला मिळते. ही निवडणूक काट्याची होणार वा मतांची मार्जिन कमी असणार, असे आहे.

नागपूर शहराला लागून असलेला कामठी मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा समिश्र स्वरुपाचा आहे. २००४ पासून येथून सातत्याने भाजप विजयी होत आहे. यंदाच्या निवडणुकीत कामठीतून एकूण १९ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात होणार आहे. या मतदारसंघात दलित आणि मुस्लीमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मतांवर काँग्रेसची भिस्त आहे. ओबीसी मतदारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पकड आहे. ते या मतदारसंघातून २००४, २००९ व २०१४ असे सलग तीन वेळा विजयी झाले होते.

विजयाची हॅट्ट्रिक करूनही त्यांना पक्षाने २०१९ मध्ये अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली होती. त्यांच्याऐवजी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली होती. सावरकर ११ हजार १३६ मतांनीच विजयी झाले होते. २०१४ च्या मताधिक्याच्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपचे मताधिक्य ७० टक्क्यांहून अधिक घटले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही महायुतीला या मतदारसंघातून कमी मते मिळाल्याने भाजपने सावरकर यांच्याऐवजी पुन्हा बावनकुळे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेसकडून पुन्हा सुरेश भोयर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१९ च्या तुलनेत कामठी मतदारसंघाचे एकूण राजकारण बदलले आहे. सुरेश भोयर यांनी लोकसभा निवणुकीत या भागातून काँग्रेसला मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते व त्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे भोयर यांच्या पाठीशी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीत कामठीमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा सुमारे १८ हजार मते अधिक मिळाली होती. यामुळेच बावनकुळे यांना सर्व समाजांना बरोबर घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदार समीर मेघेंची हॅटट्रिक रमेश बंग रोखणार ?

दोन वेळा हिंगणा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे समीर मेघे विजयाची हॅटट्रिक …

मविआ को बढ़त से रोकने के लिए सक्रिय है BJP आलाकमान

महाराष्ट्र में मविआ को बढ़त से रोकने के लिए सक्रिय है BJP आलाकमान   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *