राज्यात दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे आहेत.
महायुतीतील खातेवाटपाच्या पेचामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही सध्या बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तिघांमध्येही खातेवाटप न झाल्याने गेल्या चार-पाच दिवसांत शिंदे-पवार आपल्या मंत्रालयातील दालनात फिरकले नसून अधिकाऱ्यांच्या बैठका किंवा अन्य कामकाजही सुरू करता आलेले नाही.
विस्तार कधी?
येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र अद्याप तशा काही हालचाली दिसत नाहीत. शनिवारी विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी खात्यांवर सहमती झाली नाही, तर हा विस्तार हिवाळी अधिवेशन होईपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.