भाजपाच्या यादीत कोण?
तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रीपदांच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व गोपीचंद पडळकर या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या यादीत कुणाचा समावेश?
एकनाथ शिंदेंकडून पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल व योगेश कदम या आमदारांची मंत्रीपदासाठी चर्चा आहे.
अजित पवारांच्या यादीत कुणाचा समावेश?
सत्ताधारी महायुतीमधला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) यादीतही संबंधित आमदारांची नावं असल्याची चर्चा आहे. त्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक व इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.