Breaking News

वाढदिवसाला आईने मोबाईल न दिल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

वाढदिवसाला आईने नवीन भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून गच्चीवर जाउन गळफास लावून घेत त्यांने जीवनच संपवून टाकले. ही घटना सांगलीतील मिरजेत घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर मुलघा एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती. दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. या वाढदिवसाला त्यांने आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आई औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाउन संसाराचा गाडा हाकत असताना आर्थिक चणचणीमुळे एकुलत्या एका मुलाचा हट्ट ती पुरवू शकली नाही. यामुळे तो दोन दिवस उदास भासत होता. आज ना उद्या तो सुधारेल असे म्हणून आई व बहिण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आई व बहिण झोपल्यानंतर गङ्खीवर असलेल्या सौर उर्जेच्या अँगलला गळफास लावून त्यांने आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

BJP मंडलाध्यक्ष चुनाव में खींचतान : लाठी डंडों और बेल्ट से मारपीट से मचा हंगामा

BJP मंडलाध्यक्ष चुनाव में खींचतान : लाठी डंडों और बेल्ट से मारपीट से मचा हंगामा …

रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक

रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *