Breaking News

कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी सहस्त्रार्जुंन महाराज जन्मोत्सव

Advertisements

सहस्त्रार्जुन जन्मोत्सव कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते.सहस्त्रार्जुन क्षत्रिय चंद्रवंशीय राजा होते.सहस्त्रार्जुनचा जन्म महाराज हैह्यवंशातील १० वी पीढीतील माता पद्मिनी यांच्यापासुन झाला.जन्मनाव एकवीर होते.चंद्रवंशाचे महाराज कृतवीर्य यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना कार्तवीर्य-अर्जुन संबोधल्या जात होते.कृतवीर्य यांचे पुत्र असल्यामुळे कार्तवीर्यार्जुन या नावाने सुध्दा ओळखले जावु लागले.कार्तवीर्याजुन यांनी आपल्या आराधनेच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेय यांना प्रसन्न केले.त्यामुळे भगवान दत्तात्रेय यांनी युध्दाच्या वेळी कार्तवीर्यार्जुन यांना हजार हाताचे बळ प्राप्त करण्याचे वरदान  दिले.त्यामुळे त्यांना सहस्त्रार्जुन संबोधल्या जावु लागले.यांनाच सहस्त्रबाहु अर्जुन सुध्दा म्हणतात. सहस्त्रार्जुन (सहस्त्रबाहु) यांची कथा ग्रंथ महाभारतासह अनेक वेदांसोबतच संपूर्ण पुराणांमध्ये सुध्दा दिसून येते.भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच सहस्त्रार्जुन यांच्या कथेचे वर्णन भागवत पुराणमध्ये पहायला मिळते.देवतांच्या अनेक अवताराप्रमाणे सहस्त्रार्जुन महाराज हे भगवान विष्णूचे २४ वे अवतार माणल्या जाते.सहस्त्रार्जुन महाराज यांच्या नावाने सुध्दा पुराण  व संग्रह दिसून येते. सहस्त्रार्जुन महाराज यांच्या पुराणांचे तीन संग्रह प्रसिद्ध आहे. सहस्त्रार्जुन महाराज यांचे जन्म नाव एकवीर होते.ते कृतवीर्य यांचे पुत्र असल्यामुळे कार्तवीर्य व अर्जुन तथा सहस्त्रभुजा असल्याचा वरदान असल्यामुळे सहस्त्रार्जुंन या नावाने ओळखल्या जाते.भारतातील संपुर्ण कलार, कलाल,कलवार, कलचुरी समाज सहस्त्रार्जुन महाराजांचे वंशज आहेत.त्यामुळे कलार, कलाल, कलवार, कलचुरी समाज संपूर्ण भारतासह अनेक राज्यांमध्ये सहस्त्रार्जुन महाराजांचा जन्मोत्सव कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला दिपोत्सवाप्रमाणे मोठ्या थाटाने व उत्साहाने साजरा करून पुजा-अर्चना करतात.मध्यप्रदेशमध्ये सहस्त्रार्जुन महाराजांच्या जन्मोत्साला सार्वजनिक सुट्टी सुध्दा असते. सहस्त्रार्जुन (सहस्त्रबाहु)हे दानी,विद्वान,महाग्याणी, महापराक्रमी, महान योध्दा आणि कर्तव्य निष्ठावान राजा होते. हैह्यवंशिय महाराज कार्तवीर्य अर्जुन (सहस्त्रार्जुन) यांची पुजा सप्तमीला दिपोत्सवा प्रमाणे साजरी केली जाते.त्याचप्रमाणे हा जन्मोत्सव इतिहास, उमंग,गुनगान आणि महाराजांची अपार महिमा याला जन्मोत्सवाच्या निमित्ताने अनेक राज्यांत व शहरात मोठ्या उत्साहाने शोभायात्रा काढुन साजरी केली जाते.दरवर्षी कार्तिक मास शुक्ल पक्ष सप्तमी या तीथीला सहस्त्रार्जुन जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व थाटात साजरा करुन अनेक ठीकाणी मोठ-मोठी सजावट करून झांकीया व शोभायात्रेच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते.पौराणीक ग्रंथ व पुराणांनुसार कार्तवीर्य अर्जुन(सहस्त्रार्जुन) यांना हैह्याधिपति, दषग्रीविजयी, सुदशेन,चक्रावतार सप्तद्रवीपाधि, कृतवीर्यनंदन, राजेश्वर इत्यादी अनेक नाव असल्याचे पुराणांमध्ये वर्णन आहे. सहस्त्रार्जुन यांनी आपल्या जिवनात अनेक युद्ध लढलेत.परंतु यात रावणासोबतचे युद्ध महाकाय युद्ध मानल्या जाते.भार्गव प्रमुख जमदग्नि ऋषि (परशुराम यांचे वडील) यांच्या सोबत कृतवीर्य यांच्यासोबत चांगले संबंध होते.भागवत पुराणांमध्ये सहस्त्रार्जुन महाराज यांची उत्पत्ती व जन्म कथेचे वर्णन पहायला मिळते.सहस्त्रार्जुन यांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या करून १० वरदान प्राप्त केले व चक्रवर्ती सम्राट ही उपाधी धारण केली.नर्मदा नदीच्या काठावर सहस्त्रार्जुन व लंकापती रावण यांच्यात घनघोर महाकाय युद्ध झाले.रावण जेव्हा सहस्त्रार्जुन सोबत युद्ध करायला पोहचले तेव्हा सहस्त्रार्जुने आपल्या हजार हातांच्या बळावर नर्मदा नदीच्या वेगवान प्रवाहाला रोखले.नंतर नर्मदा नदीचे पाणी एकत्र करून पाणी सोडले, ज्यामध्ये रावणासह संपूर्ण सेना नर्मदा नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहुन गेली.या पराजयानंतर रावण आगबबुला झाला व  सहस्त्राजुनला युद्धासाठी पुन्हा ललकारले व रावण आणि सहस्त्रार्जुन यांच्यात पुन्हा घनघोर युद्ध झाले.या युद्धात रावणाचा पराजय झाला व रावणाला बंदी करण्यात आले.नंतर रावणाचे वडील महर्षि पुलत्स्य यांच्या मध्यस्थिने रावणाला सोडण्यात आले.रावण हे  बालि,बलि आणि सहस्त्रार्जुन यांच्याशी युद्ध हारले.रावण जेव्हा बालि सोबत युद्ध करायला गेला तेव्हा बालि पुजा करीत होते.परंतु वारंवार बालिला युध्दासाठी ललकारल्याने बालि आगबबुला झाले अशा परिस्थितीत बालिने रावणाला आपल्या बाजुमध्ये दाबुन चार समुद्राची परीक्रमा केली. कारण बालि शक्तीशाली होते अशा प्रकारे रावणाची अनेकदा हार झाली.याच प्रकारे पाताळ लोकांचे राजा दैत्यराज बलि होते.रावण हे राजा बलि यांच्याशी युद्ध करण्यासाठी पाताळलोकात त्यांच्या महालात पोहचले व बलिला युद्धासाठी ललकारले अशा परिस्थितीत बलिच्या महालात खेळत असलेल्या मुलांनी रावणाला पकडून घोड्यांच्या तबेल्यात बांधून ठेवले.अशा प्रकारे याही ठिकाणी रावणाची हार झाली होती.अशाप्रकारे बालि,बलि आणि सहस्त्रार्जुन यांच्याशी रावणाला पराजय पत्करावा लागला. शेवटी प्रभु श्रीराममचंद्राने रावणाचा वध केला. सहस्त्रार्जुन यांचा समाजासाठी त्याग दानशुरपणा लौकिक आहे. सहस्त्रबाहु (सहस्त्रार्जुन ) महाराजांना जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी नमन! सहस्त्रार्जुन महाराजांच्या जन्मोत्साचे (सप्तमी) औचित्य साधून भाविकांनी, समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाला वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे.कारण आपण लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या पाण्यात, फुलात,फळात,जळा-मुळात भगवान सहस्त्रार्जुन महाराजांचे दर्शन अवश्य होईल व संपूर्ण सृष्टीमध्ये हिरवीगार गालीचा निर्माण होईल आणि संपूर्ण भारतवर्षात सहस्त्रार्जुन महाराजांचा जयजयकार सर्वत्र दिसून येईल.जय सहस्त्रार्जुन महाराज! भगवान सहस्त्रार्जुन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा!जय कलार.

Advertisements

लेखक                                                                     रमेश कृष्णराव लांजेवार

Advertisements

( स्वतंत्र पत्रकार )

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं?

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं? टेकचंद्र सनोडिया …

चारित्र्यहीन राजाकडून नैसर्गिक न्यायाची अपेक्षा योग्य नाही का?

चारित्र्यहीन राजाकडून नैसर्गिक न्यायाची अपेक्षा योग्य नाही का? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   राज्याच्या कारभारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *