भगवान सहस्त्रार्जुन जन्मोत्स्व नागपूर येथे शोभायात्रा थाटात संपन्न
कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला भगवान सहस्त्रार्जुन जन्मोत्सव संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याच अनूषंगाने दिनांक २९ आक्टोंबर २०२५ कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला भगवान सहस्त्रार्जुन जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.हि शोभायात्रा गोलीबार चौक येथुन प्रारंभ होऊन गांजाखेत चौक,गांधीबाग गार्डन, तीननल चौक,भारत माता चौक,नंगापुतळा चौक या परीसरातुन वाजतगाजत नेण्यात आली यावेळी समाजाच्या अनेक भक्तांनी झांकीवर फुलांचा वर्षाव करून भगवान सहस्त्रार्जुन यांना नमन केले व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि या शोभायात्रेचे समापन गोलीबार चौक येथे करण्यात आले. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज नागपुर,सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज नागपुर, महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना नागपूर एवं सहस्रबाहु संदेश परिवार नागपुर इत्यादी अनेक संघटनेचे समाज बांधव या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्ववर्गिय कलार समाज के अध्यक्ष भूषण दडवे, सोमवंशीय समाज के संरक्षक डाॅ सुभाष राऊत, महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचे राज्य प्रवक्ता (पत्रकार) रमेश लांजेवार इत्यादीसह समाजाचे अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.या शोभायात्रे दरम्यान डाॅ सुभाष राऊत यांनी संयुक्त आयोजन व एकतेवर जोर दिला,भूषण दडवेनी नागपुर शहरातील एखाद्या चौकाला भगवान सहस्रबाहु नाव देण्यावर भर दिला तर रमेश लांजेवार यांनी संपूर्ण शाखेतील समाजबांधवांना एकत्र करण्यावर भर दिला. शोभायात्रेमध्ये प्रामुख्याने किशोर पालांदुरकर,रमेश जायसवाल, दीपक वालोदे, दुर्गाप्रसाद चौरागडे, महेन्द्र डोहरे, अरविंद राय,उमेश चौकसे,अनिल मानापुरे,राजेन्द्र राय,देवेन्द्र राय,दिनेश परिहार,अभय राऊत,मिलींद मानापुरे,किशोर दहीकर,शेखर डोरलीकर राकेश जायसवाल,विजय दहीकर, मदनसा रतन, राकेश चव्हाण, पंकज दहिकर,प्रणाली चव्हाटे, सौ अनिता नाकोड,श्रध्दा परिहार, वैशाली मामर्डे, सौ कुमुदिनी बारड,श्रीमती इंदिरा पवार, गजानन पटले,धर्मराज नाकोड, दिलीप राऊत, बलवंत चव्हाटे आदीसह शेकडोंच्या संख्येने अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनित
रमेश लांजेवार (राज्य प्रवक्ता)
महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
विश्वभारत News Website