Breaking News
Oplus_131072

नर्सचा छळ करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

Advertisements

मुलचेरा तालुक्यातील एका उपकेंद्रातील कंत्राटी महिला आरोग्य सेविकेला दोन वर्षांपासून वेतनवाढीच्या आमिषावरून अश्लाघ्य मागण्या व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर अखेर ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिकेने ६ डिसेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्या जबाबावरुन गडचिरोली ठाण्यात झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण मुलचेरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Advertisements

 

वेतनवाढ रोखून धरत परिचारिकेचा छळ केल्याचा गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री (५०) याच्यावर आरोप आहे. या छळाला कंटाळून ६ डिसेंबरला विष प्राशन केल्यानंतर परिचारिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Advertisements

 

दरम्यान, डॉ. मशाखेत्री याचे संबंधित परिचारिकेसोबतचे कॉल रेकॉर्ड, अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावे तपासले जाणार असून त्याच्या मागावर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या स्वाक्षरीने संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. विनोद मशाखेत्री यास अटक करुन सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर पाच बळी जाऊनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री याची वरिष्ठांनी पाठराखण केली होती. आता या ताज्या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेतील अंतर्गत कारभार, महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि अधिकारी-कर्मचारी नातेसंबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

या कलमांन्वये गुन्हा दाखल

बीएनएस कलम ७५(२), ७८(२) अंतर्गत गुन्हा परिचारिकेच्या पतीने दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ७५(२), ७८(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. दोन वर्षांपासून वेतनवाढ करून देतो, या नावाखाली कथित शारीरिक सुखाची मागणी, सततचे अश्लील मेसेज आणि मानसिक त्रास याबाबतच्या पुराव्यांसह गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर शहर में 65 करोड़ की जमीन का गोलमाल: दोषियों के खिलाफ मामला दर्ज

नागपुर शहर में 65 करोड़ की जमीन का गोलमाल: दोषियों के खिलाफ मामला दर्ज टेकचंद्र …

१४ महिन्याच्या बालकाला ‘कुलर’चा शॉक

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. मात्र, याच कुलरमधील विद्युत प्रवाह एका चिमुकल्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *