वर्धा प्रतिनिधी :- आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा च्यावतिने
*उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खाजगीकरणात रद्द करा* *उमेद मध्ये कार्यरत कर्मचारी व वर्धीनी सिआरपी.कृषीसखी .पशुसखी.बँक सखी इत्यादींचे थकी वेतन मानधन त्वरीत देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इत्यादी मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या नावाने .जिल्हाधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्या मार्फत देण्यात आले.
*वर्धा जिल्ह्यातील *उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी* महाराष्ट्रातील गरीब महिलांचे आर्थिक व सामाजिक स्थान मजबुत करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील वर्धीनीनी राज्यभर फिरुन बचत गटाचे जाळे निर्माण करणाऱ्या वर्धीनी व उमेद कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे उमेद अभियान जिवंत राहीलतरच रोजगाराचा प्रश्न सुटू शकेले ,या कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील ५० लाख कुटुंबाला जोडले आहे म्हणूनच वर्धा जिल्हा पायलट जिल्हा म्हणून ओळखला जातो.
खाजगीकरण थांबवण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यातील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनकडुन निवेदनाद्वारे खाजगीकरण थांबवा अशी मागणी करणे सुरू आहे उमेद अभियानांतर्गत आतापर्यंत २२ पेक्षा जास्त जिल्ह्यातील महिलांना सक्षमिकरण करण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत महिलांना बचत गटांचा माध्यमातून जोडले जातात व त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यात आले आहे म्हणुन या अभियानाअंतर्गत कित्तेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे व महिला सक्षम झाल्या आहे
अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण मागील ९ वर्षापासून ह्या वर्धिनीने करीत आहे .
सन २०१९ -२०२० या वर्षात माहे नोव्हेंबर २०१९ पासून राज्यभरात ४५ दिवसांच्या फेरीला जावून उत्तम काम केले परंतु १० महिन्यापासून मानधन मिळाले नाही *वर्धिनीला मानधन देण्यासाठी जिल्हा कार्यालय वर्धा कडून अनुदानाची मागणी करण्यात आली परंतु महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कार्यालय नवी मुंबई कडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यातील वर्धिनीवर मोठे संकट आले आहे.एवढेच नव्हे तर शासनाने *हा अभियान बाह्ययंञने* कडे म्हणजे या अभियानाचा खाजगीकरण करण्यात येत आहे त्यामुळेच अभियानाला देशभरात उत्कृष्ट पणे राबविणा-या कंञाटी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकने याशिवाय दुर्दैवी गोष्ट आहे . याला सरकारचे कामगार विरोधी धोरण कारणीभूत आहे. असे आयटक राज्य उपाध्याक्ष दिलीप उटाणे यांनी सांगितले
वर्धा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालया समोर आंदोलन मुख्य संघटक किरण मर्धरीले जिल्हा अध्यक्ष साधना झपाटे जिल्हा सचिव रत्ना भेंडे कोषाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करुन निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांना देण्यात आले .
जिल्ह्यातील आठ तालुक्यात आंदोलन करुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले शेकडो महिला सहभागी होते.
Check Also
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा
वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …