वर्धा जिल्हा प्रतिनिधी :आर्वी : कोरोनाच्या मानवी प्रादुर्भाव सोबतच नव्याने जनावरांवर लम्पी भयंकर रोगाचे सावट उभे आहे. त्यामुळे सर्कसपूर येथे दिनांक २९ सप्टेंबरला जनावरांचा या रोगाच्या प्रादुर्भावापासुन रक्षणार्थ उपसरपंच निखील कडू यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती आर्वी अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ वाठोडा अंतर्गत सर्कसपूर येथे डॉ. व्ही. बी. मडावी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पं. स. आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पी डिसीज प्रतिबंधक लस व गोचीड, गोमाशा निर्मुलन बाबत गोपालकांना मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
सर्कसपूर येथे लम्पी स्किन डिसीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संप्पन्न
गाई व म्हशी मधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्कीन डिसीज हा त्वचारोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. ही लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करने नितांत गरजेचे आहे. लंपी स्कीन डिसीज हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स या विषाणू मुळे होतो.
चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, इ. द्वारे हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो.
शिबीराच्या यशस्वीतेकरीता पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी श्रेणी २ वाठोडा येथील सहायक पशुधन विकास अधिकारी एस. डी. लहूळकर तसेच आर. डी. पवार परीचरक, एम. आर. शेख परीचरक प. वै. द. नांदपूर यांनी तसेच सर्कसपुर येथील सरपंच समदुरा राऊत, उपसरपंच निखील कडू, ग्रा. पं. सदस्य दिगांबर सोलव, ग्रा. पं. सदस्या वंदना सहारे, ग्रा. पं. सदस्या राणी गोरले, ग्रामपंचायत शिपाई अरविंद कुरवाडे यांनी परीश्रम घेतले.