महात्मा गांधी १५१ वी जयंती शताब्दी महोत्सव सांगता
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे .
जो पर्यत नागरिक माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत आरोग्य तपासणीत योग्य माहीती देवून सहकार्य करीत नाही तो पर्यत ही मोहीम यशस्वी होवू शकत नाही. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरीकांच्या हाती असल्याचे प्रखर मत आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले
महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था सेवाग्राम व प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे ९ आँक्टोबर रोजी आयोजित महात्मा गांधी १५१ वी जयंती शताब्दी महोत्सव सांगता समारोह कार्यक्रमात दिलीप उटाणे बोलत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी माजी उपसरपंच मंदा वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवाग्राम महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था वैद्यकीय अधिकारी डॉ बादल भांडारकर.आरोग्य सेवक माधव कातकडे युवा सामाजिक कार्यकर्ते नितिन वानखेडे संध्या मिश्र! लता ताजने ञिवेणी काळे मनिषा गांवडे निलीमा काळे कमलेश नाल्हे यांची उपस्थिती होती
वैद्यकीय अधिकारी डॉ बादल भांडारकर यांनी कोरोणा बाबत समज गैरसमज या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले
प्रस्ताविक संध्या मिश्र यांनी केले.
संचालन आरोग्य सेविका भावना कांबळे यांनी तर आभार व समारोप आशा वर्कर कुसूम नाल्हे यांनी केले