Breaking News

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Advertisements
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी तालुका व शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ फलक झळकवित आर्वी  तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तहसीलदार चव्हाण यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्याबाबत निवेदन दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारीत अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे प्रकार सुरूच आहे. वेळोवेळी या घटनांबाबत भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अवगत करूनही घडत असलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनही विधायक प्रतिसाद देण्यात मुख्यमंत्री यांनी दिला नाही. यावरून महिला सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीचे सरकार असंवेदनशील व निष्क्रिय असुन प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासन महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळी शुभांगी पुरोहित, जयमाला कापसे, दुर्गेश पुरोहित, उषा सोनटक्के, गंगा चकोले, भारती देशमुख, रंजना कदम, करिश्मा जाधव, किरण येरेकर, वैष्णवी हायगाते, नंदिनी गिरोडकर, प्रतिभा गिरी, उर्मिला पवार, कांता कसर, पल्लवी पवार, शोभा मनवर, ज्योती कुमरे, सुमन सातघरे, यशोदा सोनवान, संगीता डोंगरे, मोनाली देशमुख, ज्ञानेश्वरी मोकलकर, कनिजा परविन, सारीका लोखंडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. …

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *