Breaking News

राज्यात मल्टीफ्लेक्स, नाट्यगृह आणि सिनेमागृहांना परवानगी ; ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होणार*

Advertisements

 

 

मुंबई

Advertisements

सिने रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना संकटामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली सिनेमागृहे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Advertisements

त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारपासून ( दि. ५) राज्यातील सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व सिनेमागृहे मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आले.

त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता जलतरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापना सुरु करण्यास संमती देण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *