चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक
विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प
चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे.
महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात अर्थसंकल्पीय सभा पार पडली. यावेळी मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार, मा.आयुक्त राजेश मोहिते, मा.उपायुक्त विशाल वाघ, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखापरिक्षक मनोज गोस्वामी यांच्यासह गटनेते उपस्थित होते. यावेळी सभापती रवी आसवानी यांनी अर्थसंकल्पीय भाषण करीत चंद्रपूरकरांसाठी राबविण्यात येणाèया नवनवीन उपक्रमांची यावेळी माहिती दिली. त्यानंतर मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांनी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे स्त्रोत आणि खर्चाच्या बाबी याविषयी माहिती दिली.
चंद्रपूर शहराचा विकास हेच ध्येय आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात चंद्रपूरकरांवर कोणतेही कराचे ओझे लादण्यात आलेले नाही. अनेक विकासात्मक कामांचा या अर्थसंकल्पात समावेश केला आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना घरापर्यंत आरोग्याच्या सोयी पुरविण्यासाठी फिरत्या रुग्णालयाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प विकासाचा असल्याची प्रतिक्रिया मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार, मा. स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी यांनी दिली.
मालमत्ता कर व इतर करातून ३२.२५ कोटी, सङ्काई शुल्क ३.८७ कोटी, उपयोगिता शुल्क ३ कोटी, बांधकाम परवानगी व विकास शुल्क ३ कोटी, गुंठेवारी शुल्क १२.५० कोटी, जीएसटी सहायक अनुदान ७५.२४ कोटी, १५ वा वित्त आयोग १० कोटी, इमारत, गाळे भाडे १.७० कोटी, पाणी कर, पाणीपुरवठा मिटरिंग, टेलिस्कोqपग शुल्क ५ कोटी व ३ कोटी, केंद्र, राज्य शासनाकडून योजनेसाठी ३७.८३ कोटी, सांडपाणी पुनर्चक्रिकरण, पुनर्वापर प्रकल्पाकरिता कर्ज रुपात २० कोटी रुपये, हे उत्पन्नाचे स्त्रोत असून, विविध योजनांत मनपाचा हिस्सा १३.६० कोटी, कोरोना उपाययोजना २.५ कोटी, महिला व बालकल्याण योजना १.८५ कोटी, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांकरिता सुविधा २ कोटी, दिव्यांग धोरण २५ लाख, नवीन विद्युत लाइन, पोल शिफ्टिंग, भूमिगत वायरिंग, पथदिवे आधुनिकीकरण २.८ कोटी, प्रत्येक झोनमधील नगरसेवकांकरिता प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ३.५५ कोटी, खुल्या जागेचा विकास ३ कोटी, आरोग्यविषय सोयीसुविधा १.२८ कोटी, नाली बांधकाम, भूमिगत नाली बांधकाम ४ कोटी, रस्ते बांधकाम ७ कोटी, विकास आराखड्यातील मंजूर अभिन्यासातील रस्ते विकास २.७ कोटी, झोनअंतर्गत विविध विकासकामे, दुरुस्ती, आकस्मिक खर्च १.२७ कोटी, कंत्राटी कर्मचारी मानधन ५.५ कोटी, मनपा निवडणूक खर्च ३.५ कोटी, मेडिटेशन हॉल बांधकाम ५० लाख, फिरते रुग्णालय ७५ लाख, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी ५० लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.