Breaking News

जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत सेवानिवृत्त.

जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत सेवानिवृत्त.
संपूर्ण महाराष्ट्रात कोविड नियंत्रणाकरिता आयुष काढाचे महत्व पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य.

चंद्रपूर दि. 1 मे : आरोग्य विभागातील जिल्हा आयुष अधिकारी तथा आयुर्वेद विस्तार अधिकारी डाॅ.गजानन रामचंद्र राऊत हे दि.३० एप्रिल २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रथम कोविड नियंत्रणाकरिता आयुषकाढा,आयुष औषधांचे वाटप,प्रत्येक गावात घरा-घरापर्यंत आयुर्वेद पोहोचविण्याकरिता मोठ्या प्रमाणात आयुषची प्रसिध्दी इत्यादी त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे.

त्यांच्या समर्पित योगदानामुळे आज सेवानिवृत्ती प्रित्यर्थ जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,आमदार किशोर जोरगेवार ,
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.राजकुमार गहलोत उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

समोसा-कचोरीपेक्षा जास्त घातक ५ हेल्दी पदार्थ

वजन वाढणे ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे, जी फक्त तीच व्यक्ती खरी खरी …

20 साल की लड़की को हेयर कलर पड़ा भारी : किडनी में सूजन   

20 साल की लड़की को हेयर कलर पड़ा भारी : किडनी में सूजन टेकचंद्र शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *