Breaking News

“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड

“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड

चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर सामूहिक फोटो काढताना अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत महापौर व आयुक्त यांनी दिलगिरी व्यक्त करीत, मास्क न घालता कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार ५०० रुपये दंड स्वतःहुन भरला तसेच सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
मंगळवार दि. १८ मे रोजी दुपारी पाच वाजता चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटन झाले. याप्रसंगी मनपा पदाधिकारी, अधिकारी आणि आरोग्य चमूसह सामूहिक फोटो काढण्यात आले. अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. ही बाब नंतर लक्षात येताच महापौर व आयुक्त स्वतःहुन दंड भरला . अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करीत नियमानुसार दंड भरला आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *