चंद्रपूर, ता. १९ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १९) फिटनेस हब जिम येथे कारवाई करून १५ हजारांचा दंड आकारण्यात आला.
सरकारनगर येथील राधिका सभागृहाजवळील फिटनेस हब जिम कोरोना नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याची माहिती मिळाली. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक ३चे मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धाड घालून कारवाई करण्यात आली. येथे तरुण-तरुणी जीममध्ये आढळून आले. या प्रकरणी जिमविरुद्ध कारवाई करून १५ हजारांचा दंड आकारण्यात आला.

फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड
Advertisements
फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड
Advertisements
Advertisements