चंद्रपूर-
कोरोना सोबत आता जिल्ह्यात काळया बुरशी आजाराने थैमान घातले असून, मंगळवारी रात्री एका 70 वर्षीय व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती वैद्याकिय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. अक्षय काशटवार यांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नाकाच्या आतल्या भागात वेगाने पसरणारी ही काळी बुरशी मृत्यूचे कारण ठरू शकते. चंद्रपूरात सध्या 50 रुग्ण आहेत.
यासह राज्यात वाढणारे म्युकरमायकोसिस रुग्ण गंभीर स्थितीकडे इशारा करीत आहे. कोरोना रुग्णाच्या उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर या आजाराचे कारण मानले जात आहे. ही औषध घेतल्याने शरिरातील साखर वाढत जाते. कोरोनामुक्त झाल्यावर नाकाच्या आतल्या भागात याचाच आधार घेत काळी बुरशी, अर्थात म्युकरमायकॉसिस आजार होतो. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे 50 रुग्ण आढळले आहेत. या आजारावर औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर्स त्रस्त आहेत.
