Breaking News

पवनार येथील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करावी, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना खासदार रामदास तडस यांची विनंती.

Advertisements
  • वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन कॉन्स्टेटर उपलब्ध करुन देण्याची केली मागणी.

 वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील पवनार जि. वर्धा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर स्थित असुन या गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या दोन राष्ट्रीय महामार्गाचा जंक्शन निर्माण झालेला आहे. वाढता वाहतुकीचा ओघ बघता या जंक्शनवर अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात. भविष्यात या जंक्शनवर होणारे अपघात टाळण्यासाठी सदर जंक्शनची तांत्रीक पध्दतीने दुरुस्ती व सुधारणा करणे गरजेचे आहे. आचार्य विनोबाजी भावे यांचे आश्रम असलेल्या पवनार जि. वर्धा येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 जात असुन दुसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 आय हा सेवाग्राम मार्गे सेलडोह कडे गेला असुन सेवाग्राम आश्रम कडे जाणारे पर्यटक, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान सेवाग्राम येथील रुग्ण व परीसरातील नागरिक या मार्गाचा मोठया प्रमाणात उपयोग करीत असतात. माझ्या अध्यक्षतेखाली असलेल्या संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीमध्ये देखील या विषयी चिंता व्यक्त करण्यात आली असुन दुरुस्ती करिता एकमताने निर्णय झालेला आहे. करिता सर्व बाबी लक्षात घेऊन सदर जंक्शनची दुरुस्ती ब्लॅक स्पाॅट दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत करावी, तसेच कोरोना दिवसेदिवस वाढता प्रभाव बघता वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन कॉन्स्टेटर देण्याची  मागणी सुध्दा यावेळी नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार रामदास तडस यांनी केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना केली.

Advertisements

     केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी यावेळी पवनार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या दोन राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन वर भविष्यातील अपघात बघता येथे सुधारना करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु तसेच ऑक्सीजन कॉन्स्टेटर सुध्दा आपल्या काही दिवसातच प्राप्त करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.     

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

BJP आमदार दादाराव केचेंच्या आश्रमशाळेत बालकाचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. येथील आश्रमशाळेतील दूरवस्थेद्दल …

वर्धा नदीतून चौघे गेले वाहून

चंद्रपूर जिल्ह्याजवळील वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा वाहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *