Breaking News

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

Advertisements

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज

Advertisements

उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

Advertisements

Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

 वर्धा,  (जिमाका):-    जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच  नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर तक्रार करण्यासाठी फार्म उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी  लिंक व्दारे अवैध रेती उत्खनन होत असल्याचे फोटो , वाहतुकीच्या वाहनाचे फोटो, वाहन क्रमांक व रेती साठा असल्याचे फोटो सह ऑनलाईन तक्रार तक्रार दाखल करावी , तक्रार कर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

प्रशासनाकडे ऑनलाईन पुराव्यानिशी तक्रार प्राप्त  होताच  अवैध रेती उत्खनन, गौण खनिज उत्खनन , रेती वाठा व वाहतुक करणा-यांवर कारवाई करणे शक्य होईल. यामुळे अवैध रेती उत्खनन व रेतीसाठेबाजीला  आळा बसेल पर्यायाने  महसूली उत्पन्नात वाढ होऊन महसूली उत्पन्नाचे 100 टकके उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *