जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ एम बी सुटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी

तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना

     वर्धा, दि 29 (जिमाका):-  कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील

जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली  इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत.

यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक

डॉ एम बी सुटे  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात.  यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

About Vishwbharat

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *