वर्धा: प्रतिनिधी:-५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात भिडी ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा / VSTF नोडल अधिकारी वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री.मुकेशजी विनायक भिसे (जिल्हा परिषद सदस्य तथा माजी कृषि सभापती) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले सौ शालूबाई हरिभाऊ गुलफोडे व शबरी आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले श्री सुरेश कवडुजी करपते व श्री शरद कवडुजी करपते या लाभार्थ्यांना घराची चावी देऊन “गृह प्रवेश” करण्यात आला तसेच घरकुल बांधकाम मिळणारे अनुदाना मध्ये लाभार्थ्यांनी त्यामध्ये स्वतःपैसे खर्च करून उत्तम प्रकारचे घर बांधले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनाच्या कृती संगमातून जसे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम पूर्ण झाले, उज्वला योजनेच्या माध्यमातून LPG गॅस मिळाला, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून लाईट ची सोय व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रा.पं ने नळ कनेक्शन देऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.पोषणा साठी घरकुल लाभधारकांना यावेळी महिंद्रा प्रेरणा सीएसआरच्या माध्यमातून परसबागेत लावण्यासाठी २० प्रकारचे भाजीपाला बियाणे किट देण्यात आले. तसेच उमेद अभियान अंतर्गत महिलांना बचत गटाशी जोडण्यात आले असल्याचे उमेद संघटिका यांनी संगितले यावेळी CSC सेंटर ला भेट देऊन त्यांच्या कामा विषयी माहिती घेण्यात आली.
ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायत आवारात श्री.सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,वर्धा) यांच्या व श्री..मुकेश विनायक भिसे (माजी कृषि सभापती जिल्हा परिषद सदस्य) हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सत्यजीत बडेनी आज पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याबद्दल व ते टाळण्यासाठी ग्रामीण भागामध्ये करावे लागणारे उपाय यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थिती :- श्री.पंकज भोयर सर (गट विकास अधिकारी पंचायत समिती देवळी), श्री.प्रविण कु-हे जिल्हा कार्यकारी अधिकारी (VSTF), श्री.राठोड (विस्तार अधिकारी देवळी), श्री.सचिन निकम तालुका समन्वयक (VSTF), श्री.सचिन बिरे (सरपंच भिडी), श्री.पी एम चौधरी (ग्रामविकास अधिकारी),श्री.रवी वाके इतर अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.